What is anandi jivan ?

Anandi Jivan Since 2021

भारतीय संस्कृतीत घरातील वृद्धांना एक आदराचे स्थान देण्यात आले आहे, कारण आपल्या प्रथा परंपरा पुढील पिढीला सोपवण्याची आणि सर्वाना सोबत घेऊन चालण्याची जिम्मेदारी याच आजी – आजोबांची आहे.

काळानुसार एकत्र कुटुंब पद्धती लोप पावत आहे आणि ‘एकला चलो रे’ च्या विचाराने कुटंब जगत आहेत, पण या मध्ये हेळसांड होते ते वृद्धांची म्हणजे आजी आजोबांची किंवा आई बाबांची. यांना कधी विचारात घेतलेच जात नाही, फक्त मी माझी बायको आणि मुले हीच आजची परीस्थिती आहे.

न्यूक्लियर कुटुंबांची संख्या वाढत असताना, दुसरीकडे वृद्ध आई-वडील आधाराशिवाय राहतात कारण त्यांची मोठी झालेली मुले परदेशात किंवा वेगवेगळ्या शहरांमध्ये किंवा गावांमध्ये काम करत आहेत.

मग आपल्या आई बाबांना कुठे ठेवणार किंवा त्यांची काळजी कोण घेणार ? हा प्रश्न प्रत्येक मुला मुलीला पडलेला असतो. आयुष्याच्या उत्तरार्धात वृद्धाश्रमात आश्रय घेणाऱ्या कुटुंबातील वृद्ध पालकांची संकल्पना भारतीय संस्कृतीला कलंकित करते. आपल्या देशाला नेहमी ज्येष्ठांसोबत एकत्र राहण्याची, त्यांच्या बुद्धीची कदर करण्याची आणि त्यांच्या उपस्थितीचा आदर करण्याच्या खोलवर रुजलेल्या परंपरेचा अभिमान वाटतो. वडिलधाऱ्यांचा आदर हा केवळ एक सांस्कृतिक नियम नाही, तर समाजाच्या अंगभूत जीवनाचा एक मार्ग आहे. तथापि, देशभरात आधुनिकीकरणाचे वारे वाहत असताना आणि पारंपारिक कौटुंबिक संरचनेत बदल होऊ लागल्याने, त्याचा ज्येष्ठ नागरिकांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होऊ लागला.

मुलांना कामानिमित्त बाहेर असल्यामुळे आई बाबा सोबत राहता येत नाही, पण त्यांना आई बाबाची काळजी नेहमी वाटत असते आणि वय झाले असल्यामुळे घरातील वृद्ध आई बाबा यांना पण एका आधाराची गरज असते. याच समस्येवर उपाय म्हणजे “आनंदी जीवन”

आपल्या आई – बाबांची जबाबदारी आनंदाने आमच्यावर सोपवा; आम्ही त्यांची काळजी घेण्यास व त्यांना आनंदी ठेवण्यास कटिबद्ध आहोत.